27/07/2025

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होवोत

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 22 जून ते 29 जून पर्यंत लोक कल्याण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे . या अंतर्गत कोल्हापूर शहरातील प्रभागात विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी सकाळी अंबाबाईला अभिषेक घालून  त्यांना दीर्घायुष्य लाभो तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळो असे साकडे घालण्यात आले .

याच दिवशी दुपारी बारा वाजता सीपीआर हॉस्पिटल चौकात कोल्हापूर थाळी नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी गोरगरीब तसेच ग्रामीण भागातून सीपीआर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने या ठिकाणी स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याचा अनेक लोकांनी लाभ घेतला.  या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आदिल फरास, यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, महेश सावंत, रेखा आवळे, जहिदा मुजावर, प्रमोद पवार, युवराज साळुंखे, जहांगीर आत्तार, सुनील गाताडे, नागेश फरांडे, ओमकार माने, बजरंग देवकर,सौरभ पवार, योगेश पाटील, अमृत सुतार,सचिन लोहार,आण्णाप्पा खमलेहट्टी, दादासो चोपडे, पूजा साळोखे शितल तिवडे, हसीना पारकर, करुणा होवाळे, रिजवाना सय्यद, सुनीता राऊत, अलका वाघेला, अनुराधा देवकुळे,अंजना सावर्डेकर, हेमलाता पोळ, पद्मा रसाळ, बाबू घाटगे, पप्पू सावंत, संदीप कांबळे, संदीप साळुंखे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply