धामणी प्रकल्प भरला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर:
गुरुवारी (ता 03) रात्री किंवा शुक्रवारी धामणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी धामणी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पाटबंधारे विभागाचे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे .तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना तेथे येण्यास बंदी आहे.