राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंञी अजित पवार यांचा 66 वा वाढदिवस उत्साहात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंञी अजित पवार यांचा 66 वा वाढदिवस उत्साहात साजरा
– माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते केक कापून जनविश्वास सप्ताहाचा प्रारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंञी अजित पवार यांचा 66 वा वाढदिवस मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार के पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष मा बाबासाहेब पाटील_आसुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे,प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पंडितराव केणे,युवक जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापुन जन विश्वास सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशास अनुसरून सोमवार 22 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 पर्यंत जन विश्वास सप्ताह म्हणून लोकोपयोगी कार्यक्रमासह ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरण रक्षण जन जागृती,आरोग्य शिबीर,सामाजिक सलोखा यासह महायुती सरकारने घेतलेले लोकप्रिय निर्णयाचे शिबीराद्वारे प्रबोधनपर प्रचार आणि प्रसाराचे लोकाभिमुख कार्यक्रम राबवुन आपल्या लोकप्रिय लोकनेत्याला साजेसा असा वाढदिवस कोल्हापूर जिल्ह्यातील गाव खेड्यात जाऊन साजरा करण्याचे तालुकानिहाय नियोजन करण्याचे आवाहन के पी.पाटील यांनी केले .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 66 वा वाढदिवस 22 जुलै 2025 रोजी साजरा करीत असताना या निमित्ताने आजच्या युवा पिढी सह जनसामान्यांना दादांच्या सामाजिक, सांस्कृतिक, कलाक्रीडा व समाज हितासाठी वेळोवेळी घेतलेले अनेक निर्णयांची माहिती होण्याच्या दृष्टीने वाढदिवसाच्या औचित्य साधून आमचे दैवत माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आम क पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनविश्वास सप्ताहात वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्यावतीने निर्सगाचे रक्षण आणि सर्वधनाचे महत्व पटवून देताना ज्येष्ठ नागरिकांना गांधी टोपी,गुलाब पुष्प व रोपटे देऊन सत्काराद्वारे सन्मान करताना झाडे लावा झाडे जगवा चा जागर करण्यात यावा,त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रशालेतील गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्यांचे वाटप आणि रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येऊन दादांची समाजाबद्दलची असणारी कृतज्ञता नमूद करण्याची संधी या निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाली आहे या संधीचा लाभ जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येवुन पक्षासाठीचे उत्तरदायित्व वाढदिवसाच्या औचित्याने जन सामान्या पर्यंत पोहोचण्यास खऱ्या अर्थाने प्रयत्न केला पाहीजे. शासनाने घेतलेल्या लोकप्रिय योजनांचा प्रचार प्रसार आणि जनजागृती करीत सर्वसामान्यांना मदत करण्यात आम्ही यशस्वी ठरल्याचा आनंद या जनविश्वास सप्ताहाचे महत्व अधोरेखित झाले पाहीजे.
पवार यांच्या 66 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची पुरोगामी विचारधारा आणि स्व यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेले राजकारण, समाजकारण समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न जनविश्वास सप्ताहात करून आदरणीय हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली याही पुढे तो असाच चालीविण्याठी आम्हीं कटिबद्ध आहोत हा संदेश तळागाळात पोहोचण्याचे आवाहन मा भैय्या माने यानी केले.
स्वागत प्रास्ताविक नितीन दिंडे यांनी केले.जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे,बाळासाहेब देशमुख, मधुकर जांभळे,संभाजी पवार, हर्षवर्धन चव्हाण यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी भिकाजी एकल,अनिल फडके, निवास ढोले, फिरोजखान पाटील,मधुकर जांभळे, संभाजी पवार, संजय चितारी, शिवाजी देसाई, आप्पासाहेब धनवडे, हर्षवर्धन चव्हाण, शहाजी जठार, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प