तक्रार निवारणासाठी महावितरणकडून ग्राहक मेळावे
तक्रार निवारणासाठी महावितरणकडून ग्राहक मेळावे
– ३० ठिकाणी घेतले ग्राहक मेळावे
– मेळाव्यात ५८५ तक्रारी प्राप्त
– ४९६ तक्रारींचा निपटारा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर मंडळांतर्गत 30 उपविभाग व 06 विभागांतर्गत वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींची सोडवणुक करण्यासाठी सोमवारी विविध ३० ठिकाणी ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्यात एकुण ५८५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी सुमारे ४९६ तक्ररींची जागेवरच सोडवणुक करण्यात आली. तर उर्वरीत ८९ तक्रारींचे सोडवणुक करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
मेळाव्यात स्मार्ट मीटर संबधी तक्रारी व शंका, शेती ग्राहकांचे HP मधील वाढ व त्यानुषंगाने HP कमी करणेसंबधी मागण्या, कृषी सोलर पंप, नवीन वीज जोड व वीज बिलासंबधी तक्रारी यांचा मुख्यत्वे समावेश होता. या मेळाव्यात स्मार्ट मीटर संबधी सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसण करण्यात आले. या मेळाव्यास ग्राहकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत त्यांच्या तक्रारींची सोडवणुक झाल्याबाबत समाधान व्यक्त केले.
दर पंधरवडयाला ग्राहक मेळावे घेण्याच्या सूचना
महावितरणच्या सर्वच सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करणेच्याच्या दृष्टीकोनातुन यासारखे ग्राहकमेळावे दर पंधरवड्याला आयोजित करणेबाबत कोल्हापूर मंडळांतील सर्वच शाखा,उपविभाग व विभागप्रमुख याना सुचना दिल्या आहेत.
गणपत लटपटे, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर मंडळ