
— पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळण्याबाबत केले जाणार होते आंदोलन
— आठवड्यातून तीन दिवस ग्रामसेवक देण्याबाबत प्रशासनाचे लेखी पत्र
कोल्हापूर/ प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील माले येथे पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे विविध कागदपत्रांसाठी ग्रामस्थांची कुचंबना होत आहे. त्यामुळे मालेगावात पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा अन्यथा एक दिवसीय उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांनी दिला होता त्याची गंभीर दखल घेत आठवड्यातील तीन दिवस मालेगावात ग्रामसेवक देण्याबाबतची लेखी वही पन्हाळा पंचायत समितीच्या वतीने दिले आहे त्यामुळे पाटील यांनी आपले आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले
याबाबत बोलताना पाटील म्हणाले, माले गावची लोकसंख्या सुमारे ५,७४५ असून गावात सन २०२३ पासून ते आजतागायत ग्रामविकास अधिकारी पुर्ण वेळ नाहीत. त्यांच्याकडे माले गावाबरोबरच ग्रामपंचायत कोतोली येथील कार्यभार असल्यामुळे त्यांना माले गावासाठी पुर्ण वेळ देता येत नाही. गावाच्या लोकसंख्येच्या आणि कामाकजाच्या दुष्टीने गावात मुख्यालयात राहणारे व ग्रामपंचायत माले येथे पुर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी देण्याबाबत वेळोवेळी माझ्याकडून पाठपुरावा सुरू होता. तरीही प्रशासनाकडून त्याचे दखल घेतली जात नसल्यामुळे १ऑगस्ट रोजी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माले ग्रामपंचायत कार्यालायसमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पण पन्हाळा पंचायत समितीकडून आठवड्यातून तीन दिवस माले ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक देण्याबाबत लेखी पत्र दिले जाणार असल्यामुळे माझे उपोषण स्थगित केले आहे असे पाटील यांनी नमूद केले.
