31/10/2025

जिल्हयातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित

 जिल्हयातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित

– मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान अभियानाला गती

 – पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील प्रकल्प होणार सुरू

कोल्हापूर / प्रतिनिधी

पालकमंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान अभियान राबविले जात आहे. 1 मे ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रशासकीय कामात गती यावी या अनुषंगाने सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजना, अभियान आणि उपक्रम यांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत साध्य निश्चितीसाठी कालावधी देण्यात आलेला आहे. पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागाने देखील मुख्यमंत्री प्रशायकीय गतीमान अभियानामध्ये जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी तालुक्यातून एका गावाची निवड करून प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे उददीष्ट निश्चित केले आहे. यासाठी 12 तालुक्यातील 09 गावांची निवड करण्यात आली असून 15 ऑगस्ट 2025 पूर्वी सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित केले जाणार आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान कालावधीत  जुलैपर्यंत जिल्हयातील 4 गावांमध्ये प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र  कार्यान्वित झाले असून उर्वरित 5 गावांमधील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र 15 ऑगस्ट 2025 पूर्वी कार्यान्वित केले जाणार आहेत.

जिल्हयातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झालेली गावे – वाटंगी (ता.आजरा), हसूरचंपू (ता.गडहिंग्लज), सरवडे (ता.राधानगरी), कोडोली (ता.पन्हाळा)

प्लस्टिक कचऱ्याची अशी लावली जाणार विल्हेवाट

जिल्हयातील सर्व प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी या अभियानांतर्गत कालबध्द नियोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व गावातील निर्माण होणारा प्लास्टीक कचरा संकलन करण्यासाठी मार्ग निश्चिती करण्यात आलेली आहे. या मार्गावरून नियमित प्लास्टीक संकलन केले जाते. संकलित केलेला कचरा प्रकल्प कार्यस्थळावर पोहोचल्यानंतर या प्लास्टीकचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया (बेलींग, श्रेडींग) केली जाते. गावस्तरावरून संकलित झालेल्या कच-याची नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. प्रक्रिया केल्यानंतरचे प्लास्टीक खाजगी व्यावयायिकामार्फत पुर्नप्रक्रियेसाठी दिले जाते. पुर्नप्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या प्लास्टीकची नोंद ही प्रक्रिया केंद्रावर ठेवण्यात आलेली आहे.
ज्या तालुक्यातील प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू झालेली आहेत. त्या तालुक्यातील गावांमध्ये घरगुती स्तरावरून प्लास्टीक संकलित व्हावे आणि संकलित केलेला कचरा प्लास्टीक प्रक्रिया केंद्राला देण्या ग्रामपंचायतींमार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहे. 15 ऑगस्ट 2025 पूर्वी उर्वरित तालुक्यातील 8 प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत सुरू आहे.

Leave a Reply