27/07/2025

प्रतिगाम्यांना रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा मानवतावाद जोपासणे गरजेचे

प्रतिगाम्यांना रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा मानवतावाद जोपासणे गरजेचे

: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

लोकराजे राजर्षी शाहू महाराज सर्व समावेशक कृतिशील विचारवंत व राजे होते. त्यांनी आपल्या राज्यामध्येच आजच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला. आजच्या भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया राजर्षी शाहूंच्या विचार कृतीतून झालेली दिसून येते. सर्व स्तरातील, सर्व जाती धर्मातील माणसांना त्यांनी आपलेसे केले. आजच्या जाती व धर्म घट्ट होण्याच्या काळामध्ये, प्रतिगाम्यांना रोखण्यासाठी राजर्षी शाहूंचा मानवतावाद जोपासणे गरजेचे आहे, तरच मानवी समाजाची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद सबनीस यांनी केले.
ते निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ पुरोगामी लेखक आणि विचारवंत प्रा. किसनराव कुराडे लिखित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जडणघडणीतील वेगळे पैलू मांडणारा, तत्कालीन राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक व राजकीय दृष्टिकोनावर भाष्य करणारा, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या क्रांतिकारी भूमिकेचे विश्लेषण करणारा स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते, तर… या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदुराव हुजरे-पाटील, अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके यांची भाषणे झाली.
यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने मानाचा फेटा, सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर लेखक प्रा. किसनराव कुराडे, भरत लाटकर, ॲड. करुणा विमल, डॉ. जी. पी. माळी, प्राचार्य दिनकर पाटील, एम. डी. देसाई, बबनराव रानगे, डॉ. श्रीपाद देसाई, अंतिमा कोल्हापूरकर, डॉ. रूपा शहा, डॉ. कपिल राजहंस, सिद्धार्थ बनणे, सरिता कांबळे, कवी सरकार, प्रा. विलास साठे, प्रा. प्रकाश नाईक, उज्वला दळवी, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, बाबुराव बसान, शंकरराव नंदनवाडे, प्राचार्य ए. बी. पाटील, प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांचाही राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी तर सूत्रसंचालन वैभव प्रधान केले. डॉ. शोभा चाळके यांनी आभार मानले.

Leave a Reply