24/10/2025

सणासुदीच्या कालावधीतच साखर कोटा केला कमी,दरवाढीचा शक्यता

सणासुदीच्या कालावधीतच साखर कोटा केला कमी

– साखरेच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता

— ऑगस्ट 2025 साठी 22 .5 लाख मे.टन साखर विक्री कोटा जाहीर 

कोल्हापूर/ प्रतिनिधी

केंद्र सरकारने ऑगस्ट 2025 साठी 22 .5 लक्ष मेट्रिक टन (LMT) साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. हा कोटा ऑगस्ट 2024 (22 LMT) इतकाच असून ऑगस्ट 2023 (2३.५+२.० जादा=२५.५) पेक्षा थोडा कमी आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत साखर पुरवठा कमी होणार असल्यामुळे साखरेच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात श्रावण मास आणि गणेश चतुर्थी (29 ऑगस्ट 2025) यांसारखे महत्वाचे सण येतात. त्यामुळे साखरेची मागणी देशभरात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व पश्चिम भारतात, लक्षणीय प्रमाणात वाढते.

गणेशोत्सव यंदा लवकर येत असल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे. जरी हा कोटा राष्ट्रीय स्तरावर संतुलित वाटत असला, तरी स्थानिक बाजारपेठांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. व्यापारी व घाऊक ग्राहक मध्य ऑगस्टपासून साखरेची साठवणूक करू शकतात, त्यामुळे किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

—————————————————–

साखरेची मागणी आणि पुरवठ्यावर बारकाईने लक्ष आवश्यक

 साखर उद्योग व व्यापार क्षेत्रातील घटकांनी मागणीचा कल आणि  पुरवठा साखळी यावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सणासुदीच्या काळात साखरेचा नियमित पुरवठा सुनिश्चित करता येईल.

पी. जी. मेढे, साखर उद्योग , तज्ञ, कोल्हापूर

Leave a Reply