सांडपाणी प्रक्रियेतील दुषित घटक कमी करण्यासाठी आणि प्लास्टिक विघटणासाठीचा नवा शोध
सांडपाणी प्रक्रियेतील दुषित घटक कमी करण्यासाठी आणि प्लास्टिक विघटणासाठीचा नवा शोध
– जैवतंत्रज्ञान विभागात नवीन स्ट्रेनचा शोध पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या संशोधनाला यश
कोल्हापूर/ प्रतिनिधी
सांडपाणी प्रक्रियेतील दुषित घटक कमी करण्यासाठी आणि प्लास्टिक विघटणासाठीचा नवा शोध विद्यापिठाच्या विद्यार्थ्याने लावला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमाचा विद्यार्थी कौशिक विनोद मुडे यांने “एकस्ट्रीम कंडीशन मधील बॅक्टेरिया” हा संशोधन प्रकल्प, विभागप्रमुख प्रा.डॉ. ज्योती जाधव आणि पीयान लॅबोरेटीजचे संचालक स्वप्नील देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पूर्ण केला.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, पदव्युत्तर अभ्यासाक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थांना संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागतो. कौशिक यांने, औद्योगिक कारखाने आणि घरगुती वापराचे सांडपाणी विविध ठिकाणाहून संकलित करून त्यातील घटकांचे वर्गीकरण केले. त्यातून मिळालेल्या बॅक्टेरिया आयसोलेट करून वेगवेगळ्या पी.एच. मध्ये ग्रो करून पाहिले. मिळालेल्या बॅक्टेरियाचे कॅरेक्टरायझेशन करून, 16s डीएनए सीक्येसिंग केले. त्यानंतर जीन-बँक डेटाबेसमधील बॅक्टेरियाच्या घटकांची तुलना केली आणि दोन नवीन स्ट्रेनचा शोध लावला. या स्ट्रेनला बॅसिलस सब्टिलिस केएसजे & झेटा 369 आणि प्स्युडोमोनस एरुजिनोसा एसकेजे झेटा 555 असे नाव -देण्यात आले. या शोधामुळे प्लास्टिक विघटन व सांडपाणी प्रक्रियेतील दुषित घटक कमी होण्यास मदत होऊ शकेल. याच विषयावर पुढे संशोधन करण्याचा मानस असल्याचे कौशिक यांनी यावेळी सांगितले. विभागातील सुविधांचा वापर करून संशोधन करता आले, यासाठी कौशिकने शिवाजी विद्यापीठ आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचे आभार मानले आहे.
या संशोधनाचे श्रेय त्याने विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि पीयान लॅबोरेटीजचे संचालक स्वप्नील देसाई यांना दिले आहे. पदव्युत्तर स्तरावर, संशोधन प्रकल्याचे अंतर्गत विद्यार्थी संशोधन करत असून, ही विभागासाठी महत्त्वाची बाब आहे, या शोधासाठी कौशिक मुडे यांचे कौतुक होत आहे.