27/07/2025

मल्हारपेठ येथे इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्या वतीने हस्तकला प्रशिक्षण शिबीर : ४० महिलांचा उस्फुर्त सहभाग

कळे प्रतिनिधी : मल्हारपेठ ( ता. पन्हाळा ) येथील सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठ -सावर्डे येथे इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्या वतीने मल्हारपेठ, सावर्डे व मोरेवाडी गावातील महिला भगिनींसाठी अगरबत्ती, धुप बत्ती व जपानी शैलीतील कोकेडमा हस्तकला प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. गावातील ४० महिलांनी या शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले.सहभागी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कृष्णा काठ स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट, कराडचे प्राचार्य सुधीर कुलकर्णी, आरती अमृत कुलकर्णी, प्रशिक्षक विकास काळे आणि सुहासिनी पाटील यांनी प्रशिक्षणार्थी महिलाना प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अर्चना चौगले, सचिव डॉ. रूपा नागावकर , सदस्या स्नेहल तबिब, अर्चना पाटील, संपादक रीना भोळे, मनीषा पाटील, सपना गुरव, शिवसेना पन्हाळा तालुकाप्रमुख अरुण ज्ञानू पाटील , भा.ज.पा. पन्हाळा तालुकाप्रमुख मंदार परितकर , सामाजिक कार्यकर्ते सुजित पाटील यांच्यासह विभागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना मिळाले नवे कौशल्य

या उपक्रमातून महिलांना नवे कौशल्य मिळाले असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे.

अर्चना चौगले – अध्यक्षा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज

Leave a Reply