27/07/2025

हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव पाटील तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड.

हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव पाटील तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड.

कळे / प्रतिनिधी

हनुमान दूध उत्पादक संस्था सावर्डे तर्फ असंडोली, ( ता. पन्हाळा )ची पंचवार्षिक निवडणूक (सन २०२५–३०) यशस्वीरित्या बिनविरोध पार पडली. तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडही बिनविरोध झाली.अध्यक्षपदी महादेव आबा पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण श्रीपती पाटील यांची निवड झाली. महेंद्र परितकर यांनी अध्यक्ष पदासाठी महादेव पाटील यांचे नाव सुचवले .त्याला आनंदा उर्फ रामचंद्र बच्चे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्ष पदासाठी जोतिराम पाटील यांनी लक्ष्मण पाटील यांचे नाव सुचवले .त्याला हरिंद्र बच्चे यांनी अनुमोदन दिले.

निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून जे.बी.कानकेकर यांनी काम पाहिले. यावेळी नंदाताई कृष्णात पाटील , वैशाली सचिन पाटील , चंदर शामराव गुरव , तुकाराम महीपती काळे, विश्वास आनंदा खाडे , स्वप्नील गोविंद पाटील, बाजीराव रंगराव पाटील, विलास तुकाराम पाटील, सुनिल शंकर पाटील , सुजित शिवाजी पाटील उपस्थित होते. हरिंद्र बळवंत बच्चे यांनी स्वागत केले, सचिव सुजित पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply