शिक्षण क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याची गरज : पाटील
शिक्षण क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याची गरज : पाटील
कळे/प्रतिनिधी : आजच्या जगात शिक्षण क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याची गरज असून यामुळे समाजसेवा व आत्मिक समाधान या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात, असे प्रतिपादन माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केले. परखंदळे (ता.पन्हाळा) येथील रामचंद्र पवार हायस्कूलचे लिपीक सर्जेराव सागावकर यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाबासाहेब चौगले होते. यावेळी सर्जेराव सागावकर यांचा माजी आमदार सत्यजित पाटील, संस्था अध्यक्ष शाम पवार, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य शाळा कृती समितीचे बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहूल पवार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोजिमाशि पतसंस्थेचे उत्तम पाटील, मनोहर पाटील, राजाराम शिंदे, प्रकाश कोकाटे, पी. एम.पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक आर. व्ही. लव्हटे व सुत्रसंचलन पी.एस. फोंडे यांनी केले. ए.एस.मस्कर यांनी आभार मानले.