27/07/2025

कोल्हापुरात लवकरच सुरू होणार खंडपीठाचे कामकाज

कोल्हापुरात लवकरच सुरू होणार खंडपीठाचे कामकाज

— १६ ऑगस्टला प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर/ प्रतिनिधी


कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अनेक आंदोलने, मेळावे, बैठका झाल्या. पण अखेर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या सेवानिवृत्तीपूर्वी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या (सीपीआर) समोरील न्यायालयीन इमारत आणि परिसराची देखभाल दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. १५ ऑगस्टला खंडपीठाची अधिसूचना प्रसिद्ध होऊन १६ ऑगस्टला प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यातून झालेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

—————————-

Leave a Reply