योजनांची जनजागृती व नवभारत साक्षरता अभियानासाठी तालुकानिहाय आढावा बैठक
योजनांची जनजागृती व नवभारत साक्षरता अभियानासाठी तालुकानिहाय आढावा बैठक
–— डॉ. एकनाथ आंबोकर
कोल्हापूर/ प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य योजनांधी जनजागृती व नवभारत साक्षरता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची योजना कार्यालयाकडील शासनाच्या विविध योजनांची जनजागृती आणि साक्षरता अभियानासाठी तालुकानिहाय आढावा बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली
यामध्ये नवभारत साक्षरता अभियान , मराठी भाषा फौडशन , राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि- मॅ ट्रिक शिष्यवृत्ती योजना , भाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती ,राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती , इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याध्यर्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवना शिष्यवृत्ती , आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता १०वी पर्यंतचे सर्वांना मोफतशिक्षण लेखाशिर्ष, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना), प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहीत आर्थिक दराने मदत देणे ,माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पाल्यांना विहीत दराने शैक्षणिक सवलत, इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये मुलांना मोफत शिक्षण , ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष पेक्षा जास्त नाही अशा पाल्यांना शैक्षणिक सवलत, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना ,सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, दुर्बल घटकांतील । ली ते 4 ची मुलीना उपस्थिती भत्ता आदी योजनांची सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरीय बैठक आयोजित केली आहे.
बैठकीचे नियोजन
16 जुलै 2025 सकाळी 11 ते दुपारी 12:30 गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी -संजीवनी विद्यानिकेतन सोमवार पेठ पन्हाळा. दुपारी 2 ते 3.30-करवीर, कोल्हापूर शहर-राम गणेश गडकरी सभागृह पेठ कोल्हापूर.
17 जुलै 2025 सकाळी 11 ते 12:30-चंदगड गडहिंग्लज आजरा-जागृती हायस्कूल गडहिंग्लज,दुपारी 2 ते 3.30 -भुदरगड कागल राधानगरी-सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड. 18 जुलै 2025 सकाळी 11 ते 12:30- हातकलंगले शिरोळ-संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे ता.हातकलंगले.
या आढावा बैठकीमध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम चे केलेल्या कामाबाबत सादरीकरण करणार आहेत.